⚡सिंधुदुर्ग दि.१८-: पेडणे हसापूर येथील श्री देवी सातेरी देवस्थानचा १८ ते २० मार्च या दरम्यान १८वा वर्धापनदिन सोहळा साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने विविध सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
१८ रोजी सकाळी ७ वाजता सामुहिकरीत्या देवीवर पंचामृत अभिषेक, (इच्छुकाने स्वतः अभिषेक साहित्य आणावे), गणपती पुजन, पुण्याहवाचन, मातृकापुजन, नांदीश्राध्द, संभारदान, देवी पंचायतन याग उपयुक्त आचार्य ऋत्विग्वरण, आचार्य कर्म प्रारंभ, प्रकार शुध्दी, देवीवर श्रीयुक्त जपाभिषेक, देवतापुजन, प्रसाद, वास्तु पुजन, अग्नि व ग्रह स्थापना व हवन, दुपारी १ वा. महाप्रसाद (पुरस्कृत श्री. शरद शांताराम मळीक आणि कुटुंबिय), दुपारी ३ वा. फुगडी व महिलांचे विविध कार्यक्रम, रात्रौ ८ वा. राज्यनाट्य स्पर्धेत सलग तीन वर्षे तिन्ही परितोषिक प्राप्त संस्था, सातेरी कलामंदिर, हसापूर, गोवा प्रस्तुत एक विलक्षण प्रेमकथा “सर्जेराव जानकी” दोन अंकी नाटक. १९ मार्चला सकाळी ७.३० वाजता प्राकारशुध्दी, स्थापित देवतांचे पुजन, देवीवर श्रीसुक्ल, देवीसुक, जपाभिषेक, देवी पंचायतन याग हवन, बलिदान, पुर्णाहुती, देवतांकडे कृपायाचना, आरती, तीर्थप्रसाद ग्रहण, दुपारी १ वाजता महाप्रसाद, संध्याकाळी ३.३० वाजता पावणी, रात्रौ ७ वा. पालखी, गावातील सुहासिनांचा दिपोत्सव, रात्रौ ९.४५ वा. श्री देवी माऊली दशावतार नाटयमंडळ, इन्सुली, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग यांचे “गजकेसरी” हे महान पौराणिक ट्रिकसीन युक्त दशावतार नाट्यप्रयोग. २० मार्चला सकाळी ८ वाजता देवीवर पंचामृत अभिषेक श्री सत्यनारायण व्रत पुजा विधी, देवताकडे कृपायाचना आरती, तीर्थप्रसाद ग्रहण, दुपारी १ वाजता महाप्रसाद, दुपारी ३वा. गावातील महीला वर्गाच्या सौजन्याने गावातील महिलांचे ग्रामस्थांसाठी कार्यक्रम, संध्याकळी ६ वा. गोव्यातील व गावातील नामवंत कलाकारांच्या सुश्राव्य भजनाचा कार्यक्रम, रात्री ७:३० वा. कासारवर्णे महिला ग्रुप समय नृत्य व गावातील महिला वर्गाच्या सौजन्याने सांस्कृतीक कार्यक्रम अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तर सर्वानी याचा लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.
