⚡मालवण ता.१८-: माजी खासदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त मालवण येथील टोपीवाला हायस्कूल मधील काळे आजींच्या शिशुविहार बालवाडी व कन्याशाळा येथील बालवाडी मधील सर्व विद्यार्थ्यांना शनिवारी दप्तर व खाऊ वाटप करण्यात आले.
यावेळी काळे आजींच्या बालवाडीमधील मुलांनी संस्कृत मधून निलेश राणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विजय केनवडेकर, जिल्हा कार्यकारणी सदस्य गणेश कुशे, दीपक पाटकर, पंकजा सादये, ललित चव्हाण, पंकज पेडणेकर, महेश सारंग, पंकज राणे, नरेंद्र जामसंडेकर, महिला तालुकाध्यक्ष पूजा करलकर, ममता वराडकर, महानंदा खानोलकर, दिव्या कोचरेकर, महिमा मयेकर, वैष्णवी मोंडकर, तारका चव्हाण, नमिता गावकर व कार्यकर्ते उपस्थित होते.
