रोणापालमध्ये 19 रोजी ‘वेतोबा’ नाट्यप्रयोग…

⚡बांदा ता.१७-: रोणापाल श्री देवी माऊली पंचायतनच्या वर्धापन दिनानिमित्त मंगळवार दि. 19 मार्च रोजी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. देवी माऊली मंदिरापाल येथे सकाळी 10 वा. सत्यनारायण महापूजा, त्यानंतर महाप्रसाद होणार आहे. रात्री 8 वा. श्री देवी माऊली सांस्कृतिक उत्सव मंडळ यांच्यावतीने चेंदवणकर दशावतार नाट्य मंडळाचा ट्रिकसिनयुक्त ‘श्री देव क्षेत्रपाल वेतोबा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग सादर होणार आहे. भाविक, नाट्यप्रेमीनी सर्व कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन श्री देवी माऊली संस्कृतिक उत्सव मंडळ रोणापाल यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page