22 वर्षीय युवकाचा मृत्यू:कामावरून घरी परतत असताना दुर्घटना..
⚡वेंगुर्ले ता.१५-:शिरोडा वेंगुर्ले मार्गावर बागकरवडी येथे मध्यरात्री गोवा येथून कामावरून न्हैचीआड येथे घरी येत असणाऱ्या 22 वर्षीय युवकाच्या दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात त्या युवकाचा मृत्यू झाला आहे. सागरतीर्थ टाक (बागकरवाडी) येथे मोटरसायकलच्या अपघातात वेंगुर्ला नैचिआड येथील संकेत किशोर पेडणेकर (वय-२५) हा तरुण जागीच ठार झाला.
संकेत हा गोवा येथे मोपा विमानतळावर कामाला होता. तो रात्री कामावरून येताना १२.३० च्या दरम्यान अपघात झाला. या घटनेची माहिती मध्यरात्री २.३० च्या दरम्यान तेथून जाणाऱ्या टेम्पो चालकाने वेंगुर्ला पोलिसांना दिल्यानुसार त्याठिकाणी वेंगुर्ला पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह रेडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यासाठी नेण्यात आला.
अपघाताचा तपास वेंगुर्ला पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करत आहेत. मयत संकेतच्या पश्चात आई, वडील व बहीण असा परिवार आहे.
