बाबु कुडतरकर ; शिंदेसेना पदाधिकारी, नगरसेवकांकडून मंत्री केसरकरांचे आभार
⚡सावंतवाडी ता.१५-: दोडामार्ग -वेंगुर्ले शहर विकासासाठी नऊ कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे.याबाबतची माहिती शिंदे गटाचे शहर प्रमुख बाबू कुडतरकर यांनी आज येथे दिली. दरम्यान याबाबत शहरातील पदाधिकारी व नगरसेवकांनी मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे लक्ष वेधले होते.हा निधी उपलब्ध केल्याबद्दल शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे शिंदे शिवसेनेचे पदाधिकारी व नगरसेवकांनी आभार मानले आहेत.
