बाळासाहेब ठाकरे यांच्या जुन्या शिवसैनिकांनी केली बाळासाहेबांची जयंती साजरी…

⚡सावंतवाडी ता.२३-: हिंदुऋदय सम्राट के बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पूर्वाश्रमीचे शिवसैनिक माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी पाळणे कोंड धरणावर बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त लावलेल्या पाच कल्पवृक्षाच्या ठिकाणी जाऊन त्या कल्पवृक्षाला पुष्पहार अर्पण करून बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी केली.
सुमारे दहा वर्षांपूर्वी बबन साळगावकर सावंतवाडी नगराध्यक्ष असताना त्यांनी पाळणे कोंड धरणावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पाच माडाची रोपे एकत्र लावली होती ती माडाच्या रोपापैकी तीन झाडे ब्रम्हा, विष्णू महेश यांच्या रुपात मोठी होऊन बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिंना उजाळा देत आहेत व आत्या त्या नारळाच्या झाडावर नारळही दिसू लागले आहेत,एक प्रकारे बबन साळगावकर यांनी आपल्या नगराध्यक्ष पदाच्या कार्यकाळात बाळासाहेब ठाकरे यांची जिवंत स्मारक उभे केले आहे, दरवर्षी साळगावकर व त्यांचे सर्व जुने शिवसैनिक त्या ठिकाणी जाऊन त्या कल्पवृक्षाला पुष्पांजली अर्पण करून वाढदिवस साजरा करतात.
यावर्षीही माजी नगरसेवक बबन साळगावकर ,माजी नगरसेवक विलास जाधव, माजी नगरसेवक सुरेश भोगटे, बंड्या तोरसकर ,संदीप नाईक ,दीपक सावंत , सीताराम गावडे ,आदींनी त्या ठिकाणी जाऊन बाळासाहेब ठाकरे यांची जयती साजरी केली.

You cannot copy content of this page