चद्रकांत कासार ; कुवत नसेल तर आम्हाला सांगा आम्ही बदलतो; मंत्री केसरकारांवर साधला निशाणा..
⚡सावंतवाडी ता.२३-: हिंदूह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आम्ही पुढे घेऊन चाललो अशी वल्गना करणाऱ्या शिंदे शिवसेनेला बाळासाहेबांच्या जंयती दिवशी सावंतवाडी बस स्थानकात त्यांचा फोटो असलेल्या बॅनरवर जुना झालेला हार बदलता येत नाही तर हे कसले शिवसैनिक आणि बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाणार. त्याच्यात बाळासाहेबांबद्दल खरी आस्था असेल तर त्यांनी जुना हार तात्काळ बदलावा आणि जर बदलण्याची कुवत नसेल तर आम्हाला सांगा आम्ही तो बदलतो अशी टिका ठाकरे सेनेचे उपजिल्हा प्रमुख चंद्रकात कासार यांनी आज येथे केले.
सावंतवाडी बस स्थानकामधील ठाकरे सेना एसटी कामगार सेनेच्या वतीने बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी नजिक असलेल्या शिंदे सेनेच्या बॅनवरचा हार पाहून उपस्थित पदाधिकाऱ्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली.
यावेळी एसटी कामगार सेना जिल्हाप्रमुख अनुप नाईक ,शहर प्रमुख शैलेश गावंढळकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मायकल डिसोजा,श्रुतिका दळवी,भारती कासार आदी उपस्थित होते.
