उभादांडा जिल्हापरिषद मर्यादित नमो चषक क्रिकेट स्पर्धेत मंगलदीप भेंडमळा संघ विजयी…

⚡वेंगुर्ले ता.२२-: उभादांडा जिल्हापरिषद मर्यादित नमो चषक क्रिकेट स्पर्धेत मंगलदीप भेंडमळा संघ विजयी तर ओंकार आडारी संघ उपविजयी ठरला.

या महा अंतिम सामन्याची नाणेफेक भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष प्रथमेश तेली यांच्या शुभ हस्ते झाली.
विजेता मंगलदिप भेंडमळा संघास रोख रक्कम 15000/- व नमो चषक तर
उपविजेता ओंकार आडारी रोख रक्कम 10000/- व नमो चषक देऊन गौरविण्यात आले. अंतिम सामना सामनावीर नवीन काळसेकर, स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज राधाकृष्ण पेडणेकर, उत्कृष्ट गोलंदाज ओमकार कुडाळकर व स्पर्धेतील मालिकावीर नवीन काळसेकर यांना गौरविण्यात आले. या बक्षीस वितरण प्रसंगी वेंगुर्ला नगरपरिषद माजी नगराध्यक्ष रजनजी गिरप, नमो चषक विधानसभा संयोजक हेमंत गावडे, मच्छिमार नेते वसंत तांडेल, विधान सभा प्रमुख हितेश धुरी, भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष भूषण आंगचेकर, तुषार साळगावकर, परबवाडा ग्रामपंचायत सदस्य संतोष सावंत, मंगेश गावडे, दादा तांडेल, अरविंद नवार, गुरुनाथ रेडकर, दादा काळसेकर, कमलकांत नवार, बाबल नाईक, राजन नवार, अरुण नवार, रुपेश नवार उपस्थित होते. स्पर्धेचे पंच म्हणून बबी कानडे, इलियास आल्मेडा, वैभव नवार, र्अँथोनी रोड्रिक्स तर समालोचक म्हणून राजा परब, मंथन परब, जयेश परब उपस्थित होते स्पर्धेच्या आयोजन साठी भेंडमळा संघाचे सहकार्य लाभले.

You cannot copy content of this page