पंतप्रधान नरेंद्र मोदीं; अयोध्या रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात मोदींच्या हस्ते विधिवत पुजा..
⚡अयोध्या दि.२२-: आज आपले राम आलेत, वर्षानुवर्षांच्या प्रतीक्षेनंतर, त्याग आणि तपश्चर्येनंतर प्रभू राम आले, असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काढले.अयोध्येतील भव्य राम मंदिरात रामलल्ला यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं. पंतप्रधान मोदींच्या हस्ते विधिवत पूजा करुन रामलल्ला यांची प्रतिष्ठापना करण्यात आली
पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले?
“आज हमारे राम आ गये, वर्षानुवर्षांच्या प्रतीक्षेनंतर, त्याग आणि तपश्चर्येनंतर प्रभू राम आले. माझा कंठ दाटून आला आहे, शरीरात स्पंदनं निर्माण झाली आहेत, आणि मन त्या क्षणात लीन झालं आहे. आपले रामलल्ला आता तंबूत राहणार नाहीत, दिव्य मंदिरात राहणार आहेत. माझा पक्का विश्वास आहे, अपार श्रद्धा आहे, विश्वाच्या कानाकोपऱ्यात रामभक्तांना याची अनुभूती आली असेल” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
ते पुढे म्हणाले “हे क्षण अलौकिक आहेत, पवित्र आहेत, हे वातावरण, ही ऊर्जा… प्रभू श्रीरामांचा आपल्यावर आशीर्वाद आहे. पण २२ जानेवारी २०२४ चा सूर्य अद्भूत तेज घेऊन आला आहे. भूमिपूजनापासून सर्वांना उमंग जाणवत होता, अन् उत्साह वाढतच चालला होता. २२ जानेवारी २०२४ हा नव्या कालचक्राचा उगम आहे. आपल्याकडून कुठलीतरी कमतरता राहिली असेल, म्हणून इतकी वर्ष आपण राम मंदिराचा निर्माण करु शकलो नाही, परंतु आता श्रीरामाने आपल्याला माफ केलं असेल” या भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केल्या.
