सोहम गावडे,संस्कार चोपडे,साना कांबळे संयुक्त दुसऱ्या स्थानी…
⚡ओरोस ता २२-: महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती,जिल्हा सिंधुदुर्ग आयोजित शिष्यवृत्ती सराव परीक्षेत जिल्हा परिषद शाळा सावंतवाडी नं.४ ची विद्यार्थिनी कु.वेदा प्रवीण राऊळ ही २५८ गुण प्राप्त करून जिल्हयात प्रथम आली आहे.
शिक्षक समिती मार्फत जिल्हास्तरीय शिष्यवृत्ती सराव परीक्षेचे आयोजन शुक्रवारी ता.१९ रोजी करण्यात आले होते.जिल्हयातील आठही तालुक्यातील १२६ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली.यामध्ये एकूण १९५४ विद्यार्थी सहभागी झाले होते.परीक्षा संपन्न झाल्यावर काही तासातच संपूर्ण निकाल घोषित केल्याने तसेच जिल्हा टॉप टेन यादी प्रकाशित केल्याने या परीक्षेची पारदर्शकता समोर आली आहे.
सदर परीक्षेत जिल्हा टॉप टेन यशस्वी विदयार्थी पुढीलप्रमाणे आहेत.पहिला क्रमांक-कु.वेदा प्रवीण राऊळ (गुण-२५८) शाळा सावंतवाडी नं.४,दुसरा क्रमांक -कु.सोहम सुधीर गावडे (गुण-२५२)शाळा सावंतवाडी नं.२,दुसरा क्रमांक- कु.संस्कार तात्यासो चोपडे (गुण २५२)शाळा जामसंडे नं.1 ता.देवगड,दुसरा क्रमांक-कु.साना शशिकांत कांबळे (गुण २५२) शाळा आरे देवीची, ता.देवगड,तिसरा क्रमांक-कु.संचिता संभाजी पाटील (गुण-२४४) शाळा ओंबळ गावठण बौद्धवाडी ता.देवगड,चौथा क्रमांक-कु.सिया विवेकानंद नाईक (गुण-२४२) शाळा इन्सुली नं.५ ता.सावंतवाडी, पाचवा क्रमांक-कु.अनय रामचंद्र घाडी (गुण – २२८) केंद्रशाळा उसप ता.दोडामार्ग,सहावा क्रमांक-कु.सोहा इमदाद खान बिजली(गुण-२२२) शाळा इन्सुली नं.५ ता.सावंतवाडी,सातवा क्रमांक-कु.सर्वेशा नितीन ढेकळे (गुण-२१६) शाळा बांदा नं.१,ता.सावंतवाडी, सातवा क्रमांक-कु.जिज्ञासा मधुकर देसाई (गुण २१६)शाळा सावंतवाडी नं.२,आठवा क्रमांक-कु.योगी मेघनाद लेले (गुण-२१४) शाळा सावंतवाडी नं.२,नववा क्रमांक-कु.लेईशा नारायण पराडकर (गुण-२१०) शाळा मालवण रेवतळे ता.मालवण,नववा क्रमांक-कु.अवनी रामनाथ बावकर (गुण-२१०) शाळा सावंतवाडी नं.२,नववा क्रमांक-कु.आराध्या अमित राऊळ (गुण-२१०) शाळा सावंतवाडी नं.२,दहावा क्रमांक-कु.उत्कर्ष सचिन आदारी (गुण-२०८)शाळा सावंतवाडी नं.२,दहावा क्रमांक-कु.श्रीनिवास बाबुराव मयेकर (गुण-२०८) शाळा वेंगुर्ला नं.३,ता.वेंगुर्ला.
टॉप टेन मधील सर्व विदयार्थ्यांना शिक्षक समिती मार्फत जिल्हास्तरीय कार्यक्रमात गौरविण्यात येणार आहे.सर्व यशस्वी स्पर्धकांचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल गवस,जिल्हा सरचिटणीस तुषार आरोसकर यांचेसह सर्व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.सराव परीक्षा यशस्वी करण्यासाठी परीक्षा प्रमुख संतोष नेरकर,विलास सरनाईक,श्रद्धा वाळके,रामचंद्र कुबल यांचेसह अनेक कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.
