श्री राम मंदिर प्रतिष्ठापनेनिमित्त भटवाडीत पणत्या व रांगोळी साहित्याचे वाटप…

परशुराम चलवाडी दाम्पत्याचा पुढाकार; सर्व स्तरातून कौतुक..

⚡सावंतवाडी ता.२२-: आयोध्या येथे श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठापना उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी भटवाडी येथे सामाजिक कार्यकर्ते श्री परशुराम चलवाडी व सौ. नीलिमा चलवाडी यांच्या पुढाकारातून प्रत्येक घरात पाच पणत्या रांगोळी अगरबत्ती असे भेटवस्तू वाटप केले.

तरी आज प्रत्येकाने आपल्या घरात पाच दिवे लावून आनंद उत्सव साजरा करावा असे आवहान शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केले होते.त्याला प्रतिसाद देत श्री चलवाडी यांनी पुढाकार घेऊन हे साहित्य वाटप केले. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होते.

You cannot copy content of this page