श्री राम मंदिर सोहळ्यानिमित्त मळगाव येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन…

भूतनाथ मंदिर परिसरात जय्यत तयारी सुरु..

⚡सावंतवाडी ता.२१सहदेव राऊळ -: अयोध्येतील श्री राम मंदिर प्राण प्रतिष्ठापना सोहळ्याच्या पाश्वभूमीवर मळगाव येथील श्री देव भूतनाथ मंदिरात सोमवारी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.


या कार्यक्रमानिमित्त गेले दोन दिवस जय्यत तयारी सुरु असून मंदिर परिसरात साफसफाई, मंदिराभोवती विद्युत रोषणाई तसेच भव्य मंडप सजविण्यात आला.
यनिमित्त सोमवारी सकाळी ८ वाजता श्री देव भूतनाथ मंदिरात पूजन, सकाळी ८.३० वाजता श्री राम प्रतिमा पूजन, सकाळी ९ ते १२.३० वाजेपर्यंत श्री राम जप व गावातून भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. दरम्यानच्या काळात सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत अयोध्येतील श्री राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे थेट प्रेक्षपण करण्यात येणार आहे. दुपारी १२.३० वाजता कारसेवक स्मरण, दुपारी १२.४५ वाजता महाआरती होणार आहे. दुपारी १.३० वाजल्यानंतर उपस्थित भाविक भक्तांना महाप्रसाद वितरण करण्यात येणार आहे.
दुपारच्या सत्रात दुपारी ३.३० वाजता महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ, सायंकाळी ४ ते ६ वाजेपर्यंत गावातील महिलांच्या फुगड्या, सायंकाळी ६ वाजता ‘महा दिपोत्सव’ व त्यानंतर सायंकाळी ७ वाजल्यापासून स्थानिक मंडळांची भजने आदी कार्यक्रम होणार आहेत. या सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page