माऊली व जुना भाजी मार्केट व्यापारी मित्र मंडळातर्फेआम.नितेश राणे यांचा सन्मान…

⚡कणकवली ता.२१-: माऊली मित्र मंडळ, जुना भाजी मार्केट व्यापारी मित्र मंडळ व संलग्न मित्र मंडळाच्यावतीने आम. नितेश राणे यांना शाल, श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.

माऊली मित्र मंडळ, जुना भाजी मार्केट व्यापारी मित्र मंडळ, व संलग्न मित्र मंडळाचे वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी श्री सत्यनारायणाच्या महापूजेचे आयोजन करण्यात आले होते,
याप्रसंगी आम. नितेश राणे यांनी श्री सत्यनारायणाच्या महापूजेचे दर्शन निमित्ताने व्यापारी मार्केटला भेट दिली, यावेळी संस्थापक अध्यक्ष राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी शाल, श्रीफळ ,पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले.यावेळी व्यापारी मित्र मंडळाचे अनिल मेस्त्री, महेश मेस्त्री, संतोष महाजन, रंगाराव पवार, विशाल रजपूत, हेमंत नाडकर्णी, जमिल कुरैशी ,लवु जैताळकर, म्हापसेकर, निखार्गे, सौ. मेस्त्री, सौ. फाटक, आदी व्यापारी बंधू भगिनी उपस्थित होते,
यावेळी आम. नितेश राणे म्हणाले,व्यापारी संकुलनाचे बांधकाम करण्याच्यादृष्टीने ज्या काही आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करणे आहे, त्या दृष्टीने तसेच बांधकाम काम चालू केल्यानंतर लवकरात लवकर ते कसे पुर्ण करून व्यापारी बांधवांना व्यवसाय करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असे ते म्हणाले .
यावेळी सर्व मंडळाच्यावतीने कलमठ गावचे सरपंच संदीप मेस्त्री , सामाजिक कार्यकर्त्या सौ. सुप्रिया पाटील, सामाजिक कार्यकर्ते अण्णा कोदे,सामाजिक कार्यकर्ते मिलिंद मेस्त्री यांचा सन्मान करण्यात आला.

You cannot copy content of this page