बांदा विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेच्या विकास अध्यक्षपदी बाळु सावंत यांची निवड…

⚡बांदा ता.२१-: बांदा विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेच्या (विकास) अध्यक्षपदी ग्रामपंचायत सदस्य तथा भाजपचे नेते राजाराम उर्फ बाळु सावंत यांची एकमताने निवड करण्यात आली. माजी अध्यक्ष घनश्याम बांदेकर यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त होते.


आज झालेल्या मासिक सभेत उपाध्यक्षपदी कार्यरत आलेले श्री सावंत यांची एकमताने निवड करण्यात आली. यावेळी माजी अध्यक्ष घनश्याम बांदेकर, संचालक संजय चांदेकर, जानू बुटे, आदम आगा, लक्ष्मण सावळ, भिकाजी धुरी, कामिनी कुडव, अर्चना आंबेलकर, अपाजी देसाई, देऊ मळगावकर, सुभाष परब, लक्ष्मण जाधव, लाडू भाईप, सचिव मयुरी परब व कर्मचारी उपस्थित होते.
निवडणूक अधिकारी म्हणून श्री आरोंदेकर यांनी काम पहिले. यावेळी नूतन अध्यक्ष बाळु सावंत यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.
श्री सावंत यावेळी बोलताना म्हणाले की, आपली विकास सोसायटीच्या अध्यक्षपदी झालेली निवड आपण सार्थ ठरवू. विकास सोसायटीच्या माध्यमातून सहकार घराघरात पोहचविण्यासाठी आपण सर्व सर्व संचालकांना सोबत घेऊन काम करण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

You cannot copy content of this page