राम भक्त व श्रीराम जन्मभूमी उत्सव समितीचे आयोजन:प्रभू रामचंद्र यांचे देखावे ठरले आकर्षण
सावंतवाडी ता.२०-: अयोध्या येथे श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच औचित्य साधून सावंतवाडी शहरात प्रभू श्री राम भक्त व श्रीराम जन्मभूमी उत्सव समिती सावंतवाडीच्यावतीने शहरात भव्य बाईक रँलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रँलीला राजवाडा येथून प्रारंभ झाला. यात प्रभू रामचंद्राचे साकारलेले देखावे आकर्षण ठरले.
भगवे झेंडे, भगवे टोप्या धारण करून रॅलीत सहभागी झालेल्या भक्तांच्या उत्साहामुळे राममय वातावरण शहरात निर्माण झाल. याप्रसंगी मोठ्या संख्येने श्रीरामभक्त मोठ्या संख्येने रँली मध्ये सहभागी झाले होते.
