वेत्ये येथे 22 रोजी विविध धार्मिक कार्यक्रम…

⚡सावंतवाडी ता.२०-: अयोध्या येथे सोमवार २२ जानेवारी रोजी होणाऱ्या रामलल्ला प्राणप्रतिष्ठापन व राममंदिर लोकार्पण सोहळ्यानिमित्ताने श्री कलेश्वर पूर्वी देवी मंदिर येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळी 9 वा. अभिषेक, 9.30 वा. श्री राम पूजन, 11 ते 11.30 वा. रामरक्षा स्तोत्र पठण, 11.30 वा. आरती व तीर्थप्रासाद, दुपारी 4 ते संध्याकाळी 7 वा. हळदी कुंकू/कुंकू मार्जन, 7 वा. दीपोत्सव, रात्रो 8 ते 11 वा. स्थानिक भजनांचा कार्यक्रम, 11 ते 11.30 वा. महाआरती होणार आहे. वेत्ये गावातील प्रत्येक कुटुंबातील सदस्याने संध्याकाळी 7 वाजता दीपोत्सवसाठी मंदिरमध्ये दोन पणत्या आणून लावाव्यात असे आवाहन करण्यात आले आहे. तरी सर्व ग्रामस्थ, भाविकांनी कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन वेत्ये सरपंच गुणाजी गावडे तसेच ग्रामस्थांतर्फे करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page