आम.नितेश राणे यांच्या हस्ते २२ रोजी महाआरती आणि कार सेवकांचा सत्कार…

छत्रपती शिवाजी महाराज चौक कणकवली येथे भव्य कार्यक्रम..

⚡कणकवली ता.२०-: २२ जानेवारी रोजी कणकवली येथे आमदार नितेश राणे यांच्या हस्ते महाआरती करण्यात येणार आहे. तर १९९२ साली कार सेवक म्हणून अयोध्येला गेलेल्या मतदारसंघातील कणकवली, देवगड, वैभववाडी या तीन तालुक्यातील कार सेवकांचा सत्कार सोहळा पार पडणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक कणकवली येथे सायंकाळी ७.०० वाजता हा कार्यक्रम होणार आहे तर त्या नंतर प्रभू श्रीराम यांचेवर महान पौराणिक नाटक होणार आहे.
२२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्ये मध्ये प्रभू श्रीरामाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. सदरहू कार्यक्रमाच्या निमित्ताने देशभर अनेक धार्मिक कार्यक्रमांचे नियोजन केले जात आहे. कणकवली, देवगड, वैभववाडी मतदारसंघाचे आम.नितेश राणे यांच्या हस्ते कणकवलीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकात सायंकाळी ७.०० वाजता महाआरती करण्यात येणार असून त्यानंतर १९९२ साली कारसेवक म्हणून अयोध्येला गेलेल्या मतदारसंघातील मान्यवरांचा सत्कार सोहळा पार पडणार आहे. त्यानंतर रात्रौ ९ वाजता प्रभू श्रीरामाच्या राम लीलांचे दशावतारी नाट्य सादर करण्यात येणार आहे.अशी माहिती आम. नितेश राणे यांच्या कार्यालयाकडून प्रसिध्दी पत्राद्वारे दिली आहे.

You cannot copy content of this page