पाडलोस येथे २२ रोजी दशावतारी नाट्यप्रयोग…

⚡बांदा ता.२०-: अयोध्या येथे सोमवार २२ जानेवारी रोजी होणाऱ्या रामलल्ला प्राणप्रतिष्ठापन व राममंदिर लोकार्पण सोहळ्यानिमित्ताने पाडलोस श्री देव रवळनाथ माऊली पंचायतन येथे विविध धार्मिक कार्यक्रम तसेच रात्री 9 वा. श्री देव हेळेकर दशावतार नाट्यमंडळ कारीवडे यांचा नाट्यप्रयोग सादर करण्यात येणार आहे.
देव रवळनाथ मंदिरात सकाळी अभिषेक व देवतांची पूजा, प्रभु श्रीरामांच्या फोटोचे पुजन, श्रीराम नाम जप मंत्र उच्चारण, प्रभु श्री रामांच्या फोटोवर अक्षता वाहणे आदी धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. तसेच रात्री 9 वाजता हेळेकर दशावतार नाट्यमंडळ कारीवडे यांचा नाट्यप्रयोग सादर करण्यात येणार आहे. सर्व ग्रामस्थ, भाविकांनी तसेच नाट्यप्रेमीनी कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामस्थांतर्फे करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page