राजन तेली: मंत्री दीपक केसरकर यांचं नाव न घेता लगावला टोला..
⚡सावंतवाडी ता.१९ -: रेल्वे टर्मिनस प्रश्न सुटावा ही माझी इच्छा आहे यासाठी मी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री यांच्यासोबत चर्चा केली आहे. त्यामुळे इतरांप्रमाणे घोषणा करून आश्वासन देणाऱ्या पैकी मी नव्हे असा टोला माजी आमदार राजन तेली यांनी मंत्री दीपक केसरकर यांचे नाव न घेता लगावला. दरम्यान कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे प्रश्न रास्त आहे यासाठी मी निश्चितच त्यांच्या प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करेन असे ही तेली म्हणाले ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते
