‘नमो चषक २०२४ ‘अंतर्गत जिमखाना मैदानावर आयोजन.
⚡सावंतवाडी ता.१८- : भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाच्या माध्यमातून सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात ‘नमो चषक क्रीडा स्पर्धा २०२४ ‘ चे आयोजन करण्यात आले असून या अंतर्गत सावंतवाडी शहर मर्यादित क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन सावंतवाडी चे माजी नगराध्यक्ष तथा भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष प्रथमेश तेली, विधानसभा क्रीडा आघाडी प्रमुख निशांत तोरस्कर, भाजपचे आंबोली मंडल अध्यक्ष तथा जिल्हा बँक संचालक रवी मडगावकर, जिल्हा कार्यकारणी सदस्य तथा माजी नगरसेवक मनोज नाईक, आनंद नेवगी, शहर मंडल महिला अध्यक्ष मोहिनी मडगावकर, भाजपा महिला मोर्चा जिल्हा चिटणीस मिसबा शेख, माजी नगरसेविका दिपाली भालेकर, युवा मोर्चा शहर अध्यक्ष संदेश टेमकर, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस बंटी पुरोहित, तालुका उपाध्यक्ष दिलीप भालेकर, परिक्षीत मांजरेकर, विनोद सावंत, केतन आजगांवकर आदी उपस्थित होते.
सावंतवाडी जिमखाना मैदानावर ही स्पर्धा होत असून स्पर्धा तीन दिवस चालणार आहे. या स्पर्धेत भाजपचे आजी-माजी पदाधिकारी लोकप्रतिनिधी माजी नगरसेवक तसेच कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. तर २३ जानेवारी रोजी याच मैदानावर प्रकाशझोतातील रस्सी खेच स्पर्धा संपन्न होणार आहे. या सर्व स्पर्धांचा लाभ घ्यावा असे आवाहन भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष प्रथमेश तेली यांनी केले आहे.
