बाबा काणेकर:शीतल राऊळ यांचा पाठपुरावा..
⚡बांदा ता.१८-: बांदा वासियांचे आराध्य असलेल्या श्री देव बांदेश्वर मंदिर भक्त निवासासाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दहा लाख रुपये मंजूर केले आहेत. यासाठी सावंतवाडी पंचायत समितीचे माजी सभापती शीतल राऊळ यांनी लेखी पत्रव्यवहार करत सातत्याने पाठपुरावा केला होता.
याबाबतची माहिती भाजपाचे बांदा शहराध्यक्ष बाबा काणेकर यांनी दिली आहे. वर्षभर मंदिरात विविध सण उत्सव हे मोठ्या उत्साहात साजरे करण्यात येतात. बाहेर गावातील भक्तांना याठिकाणी राहता यावे यासाठी भक्त निवास उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. पालकमंत्री श्री चव्हाण यांनी यासाठी निधी मंजूर केल्याने भारतीय जनता पार्टी बांदा शहराच्या वतीने आभार मानत आल्याचे श्री काणेकर यांनी सांगितले.
