कणकवलीत व्हिडिओ गेम पार्लरला पोलिसांचा दणका…

तब्बल 44 मशीन जप्त;जुगार प्रतिबंधात्मक कायद्यानुसार कारवाई..

⚡कणकवली ता.१७-: व्हिडिओ गेम पार्लरवर कणकवली पोलिसांनी लक्ष वळविले असून कणकवली शहरातील तब्बल 5 व्हिडिओ गेम पार्लरवर जुगार प्रतिबंधात्मक कायद्यानुसार कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये कणकवली मधील पाच व्हिडिओ गेम पार्लर मालक, पाच चालक व दोन खेळाडू यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.यात 40 हजार रुपयांची रोख रक्कम व 44 व्हिडिओ गेमच्या मशीन जप्त करण्यात आल्या.
कणकवली शहरातील व्हिडिओ गेम पार्लरचे चालक-मालक यांच्यावर हे गुन्हे दाखल करण्यात येत असून, कणकवली पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे व्हिडिओ गेम पार्लर चालकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. कणकवली पोलिसांच्या या कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
व्हिडिओ गेम पार्लरवर कारवाईची अनेकदा मागणी करण्यात आली होती. व्हिडिओ गेम पार्लरमध्ये अनेक जणांचे पैसे यामध्ये गेल्याने अनेक जण देशोधडीला लागले होते. पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजकुमार
मुंढे, पोलीस उपनिरीक्षक शेगडे, पोलीस नाईक रुपेश गुरव,
पोलीस कॉन्स्टेबल किरण मेथे, सुशांत कोलते, सागर जाधव,
रणजीत दबडे, राज आगाव, रघुनाथ जांभळे, विनोद चव्हाण
आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

You cannot copy content of this page