गोगटे वाळके महाविद्यालयात आरोग्य विषयक शिबिर संपन्न…

⚡बांदा ता.१७-: येथील गोगटे वाळके महाविद्यालयात दि. 16 जानेवारी रोजी महिला विकास कक्षाच्या अंतर्गत “आरोग्यावर बोलू काही” या विषयावर आरोग्य विषयक मार्गदर्शनपर व्याख्यान घेण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख व्याख्याता म्हणून सहज ट्रस्टच्या अध्यक्ष आणि मानसोपचार तज्ञ मीनाक्षी मॅडम उपस्थित होत्या.” विद्यार्थ्यांचे मानसिक, शारीरिक आरोग्य महत्त्वाचे आहे तरच सामाजिक आरोग्य चांगले राहील”, असे सांगताना त्यांनी विद्यार्थ्यांना सहजपणे आरोग्यविषयक सजग करण्याचा प्रयत्न केला.
या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ. जी. जी. काजरेकर ,महिला विकास कक्षाच्या प्रमुख प्रा. रश्मी काजरेकर, प्रा. प्रसाद जाधव, प्रा. उमेश परब आणि महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. हर्षवर्धिनी जाधव यांनी केले तर आभार सुप्रिया नातू यांनी मानले.

You cannot copy content of this page