कै.सिताराम तर्फे सर स्मृती चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने आनंदाश्रय आश्रमला ब्लॅकेंट प्रदान…

⚡कणकवली ता.२८-: जांभवडे येथील सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात प्रभावी कामगिरी केलेले कै.सिताराम(आबा) सखाराम तर्फे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांचे उर्वरित शैक्षणिक, सामाजिक कार्य पुढे नेण्यासाठी स्थापन केलेल्या कै.सिताराम(आबा) सखाराम तर्फे सर स्मृती चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने जीवन संजीवन सेवा ट्रस्टच्या आनंदाश्रय आश्रमातील अनाथ , निराधार नागरिकांना ब्लॅकेंट प्रदान करण्यात आले.
यावेळी ट्रस्टचे सचिव तथा सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष वामन तर्फे, ट्रस्टचे विश्वस्त तथा जि.प. सिंधुदुर्गचे माजी गटनेते नागेंद्र परब, विश्वस्त वैभव तर्फे,सौ.स्वाती कविटकर,मोहन तर्फे, शैलैश तर्फे,सौ.सोनाली तर्फे, स्वप्नील कविटकर,प्रथमेश पावसकर यांच्या हस्ते आश्रमाचे संस्थापक अध्यक्ष गोविंद परब यांच्याकडे ब्लॅकेंट सुपुर्द करण्यात आले.यावेळी आश्रमातील अनाथ निराधार नागरिकांच्या चेहऱ्यावरील हास्य पाहून उपस्थितांना समाधान वाटले.उपस्थित सर्वांनी आश्रमातील सर्व उपक्रम, सुविधा, व्यवस्थापन, कार्यपद्धती यांची माहिती घेतली व गोविंद परब दांपत्याने आश्रमाच्या माध्यमातून सुरु केलेल्या जनसेवेचे कौतुक केले.या आश्रमात कोणत्याही प्रकारची फी न घेता जिल्ह्यातील अनाथ, निराधार नागरिकांना सर्व प्रकारची सेवा मोफत पुरवीली जाते. यावेळी आश्रमाची गोविंद परब यांच्या कार्याची सविस्तर माहिती उपस्थितांनी जाणून घेतली.आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बाबा आमटे आहात असे उद्गार ट्रस्टचे सचिव तथा सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष वामन तर्फे यांनी काढून गोविंद परब यांच्या कार्याचे कौतुक केले.

You cannot copy content of this page