संविधान बचाव यात्रा २९ नोव्हेंबर रोजी वैभववाडीत…

⚡वैभववाडी ता २७-: रिपब्लिकन सेना महाराष्ट्र यांच्यावतीने डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातु , इंदुमिल आंदोलनाचे प्रणेते रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असलेली संविधान बचाव यात्रा बुधवार दिनांक २९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ वा. वैभववाडी येथे येणार आहे. अशी माहिती रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण जाधव  यांनी देत सर्व संविधान प्रेमी नागरीकांनी उपस्थित राहावे, असे आवाहनही प्रसिद्धीपत्राद्वारे केले आहे.
    भारतीय संविधानाने या देशाला स्वातंत्र्य , समता, बंधुता आणि न्यायाचा विचार सूञात गुंफून देशाला समृद्धीच्या उंच शिखरावर नेले आहे. तेच संविधान आज बदलण्याची भाषा केली जात आहे. हा धोका ओळखून समाजातील सर्व जाती धर्माच्या नागरीकांनी एकञ येऊन संविधानिक, समतामुलक, समाज व्यवस्था निर्माण करण्यासाठी जागरुकतेने एकसंघ होऊन लढा उभारणे गरजेचे आहे. या दृष्टीने समाजात जागृती निर्माण व्हावी. समाजामध्ये संविधानिक मूल्य रुजविणे  आणि सामुदायिक अस्मिता प्रत्येक नागरीकांमध्ये निर्माण होऊन समाजामध्ये संविधानिक साक्षरता आणि संविधानिक जागरुकता निर्माण व्हावे. या हेतून ही संविधान बचाव याञा काढण्यात येत आहे.
    लोकशाहीचा जागर संविधानाचा आदर हे ब्रीज वाक्य घेऊन २४ आक्टोबर २०२३ पासून लोकशाही मार्गाने दिक्षाभूमी नागपूर येथून संविधान याञेस सुरुवात करण्यात आली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष समाजभूषण काकासाहेब खांबाळकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रभर संविधान बचाव याञा काढण्यात येत आहे. बुधवार दिनांक २९.नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ वा. वैभववाडी संभाजी चौक येथे या याञेचे आगमन होणार आहे.यावेळी रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय प्रवक्ते अॕड संघराज रुपवते, राष्ट्रीय सरचिटणीस संजीवजी बोधनकर आदी मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी तालुक्यातील सर्व नागरीकांनी उपस्थित राहुन संविधान याञेचे स्वागत करावे. असे आवाहन जिल्हाध्यक्ष जाधव प्रसिद्धीपञाद्वारे केले आहे.

You cannot copy content of this page