मळगाव-रवळनाथ मंदिर परिसरात राबविण्यात आली स्वच्छता मोहिम…

शारदा ग्रामसंघ मळगावच्यावतीने राबविला उपक्रम…

⚡सावंतवाडी ता.२७: सहदे राऊळ महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान उमेद अंतर्गत शारदा ग्रामसंघ मळगावच्यावतीने आज स्वच्छता मोहिम राबवत मळगाव रवळनाथ मंदिर परिसराची साफसफाई करण्यात आली. त्यांनी राबविलेल्या या उपक्रमाचे मळगाव ग्रामस्थांमधून व परिसरातून कौतुक होत आहे.


काल रविवारी मळगाव रवळनाथ जत्रोत्सव पार पडला. या जत्रोत्सवानिमित्त मंदिर परिसरात विविध प्रकारची मोठ्या प्रमाणात दुकाने थाटण्यात आली होती. त्यामुळे मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात कागद, प्लास्टिकचा कचराही झाला होता. शारदा ग्रामसंघ मळगावच्या महिला सदस्यांनी एकत्र येत सर्वप्रथम संपूर्ण मंदिर परिसरात झाडलोट करत परिसर स्वच्छ केला. यावेळी जमा झालेले कागद, पुठ्ठा आदी सुका कचरा मंदिर परिसरापासून दूर नेत जाळून त्याची विल्हेवाट लावण्यात आली. यावेळी प्लास्टिक कचरा गोळा करून एका गोणीत भरून ठेवण्यात आला. तसेच मंदिर परिसरात पडलेली फुले आदी निर्माल्य एका गोणीत भरून ठेवून मंदिर परिसर स्वच्छ करण्यात आला. या उपक्रमात रंजना तेली, निकिता बुगडे, संजना गवंडे, गौरी डिचोलकर, कृतीका गावकर, गौरी कुडव, करुणा राऊळ, शुभदा कुडव, लिली हरमलकर वेदिका भगत , स्वरुपा राऊळ आदी सहभागी झाले होते. त्यांनी राबविलेल्या या स्वच्छता उपक्रमाबद्ल मळगाव देवस्थान कमिटीच्यावतीने आभार व्यक्त करण्यात आले.

You cannot copy content of this page