वेळीच बोनस मिळाल्याने शेतकऱ्यांमधून समाधान…
⚡सावंतवाडी ता.२७-: न्हावेली येथील कृपासिंधू दूध सहकारी संस्थेच्या मार्फत शेतकरी दूध उत्पादकांना सन 2022-23 च्या बोनसचे वाटप करण्यात आले. संस्था अध्यक्ष शरद धाऊसकर यांच्या हस्ते तब्बल 35 दुध उत्पादकांना एकूण 62 हजार 342 एवढा बोनस वाटप करण्यात आला.
न्हावेली येथे गतवर्षीपासून कृपासिंधू दूध सहकारी संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. पंचक्रोशीतील दूध उत्पादक शेतकऱ्यांना यामुळे फायदा झाला. न्हावेली गावासह सोनुर्ली, निरवडे, पाडलोस, पेंडूर गावातील दुध उत्पादक शेतकऱ्याचे याठिकाणी दूध संकलन केले जाते. संस्थेने यावर्षीचा बोनस दूध उत्पादक शेतकऱ्यांना नुकताच पुरवठा केला. यावेळी दूध संस्थेचे अध्यक्ष शरद धाऊसकर, सचिव अर्जुन परब, सहसचिव वैभव धावसकर, संचालक लक्ष्मण परब, संतोष निर्गुण,लक्ष्मण धाऊसकर, प्रशांत कांबळी,रवी धाऊसक व दूध उत्पादक शेतकरी उपस्थित होते. वेळीच बोनस मिळाल्याने शेतकऱ्याकडून आनंद व्यक्त करण्यात आला.
