स्वतः च्याच रेड्याने हल्ला केल्याने महिला शेतकरी जखमी…

पारपोली येथील घटना: राजू मसूरकरांची माहिती..

सावंतवाडी : पारपोली गावटणवाडी येथील शेतामध्ये चारायला घेऊन जात असताना रेड्याने मालकी वरच हल्ला करून तिला गंभीर जखमी केले आहे. रश्मी रामकृष्ण गावकर (45) असे तिचे नाव असून तिला येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. असता त्यांना अधिक उपचारासाठी येथील गोवा बांबुळी येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. याबाबतची माहिती सामाजिक कार्यकर्ते तथा जीवन रक्षक प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी दिली.

You cannot copy content of this page