करिवडे कालिका मंदिर रस्ता दूर्तफा झाडीची साफसफाई…

रवी परब मित्र मंडळाच्यावतीने राबविण्यात आला स्वच्छता उपक्रम..

⚡सावंतवाडी ता.२७-: कारिवडे कालिका मंदिर रस्ता दूतर्फा वाढलेली झाडी अपघाताची शक्यता लक्षात घेता रवी परब मित्र मंडळाने एकत्र येत ही वाढलेली झाडी तोडून साफसफाई करत रस्ता वाहतुकीस सुरळीत केला. त्यांनी हा उपक्रम राबवत केलेल्या या कामाचे गावातून कौतुक होत आहे.


कारिवडे येथील कालिका मंदिर रस्ता दूर्तफा मोठ्या प्रमाणात झाडी वाढली होती. या वाढलेल्या झाडीमुळे समोरून येणारे वाहन दिसत नव्हते. त्यामुळे सतत छोटे मोठे अपघात होत होते. काल रविवारी सकाळी दोन गाड्यांचे या झाडीमुळे असेच अपघात झाले. हे समजताच या पुढे कोणताही अनर्थ होऊ नये म्हणून
रवी परब मित्र मंडळ यांनी हे काम लगेच हाती घेत रस्ता दूर्तफा वाढलेली झाडी साफ केली. यावेळी दिपक करिवडेकर रवी परब मित्रमंडळ ग्रुपचे सदस्य उपस्थित होते.

You cannot copy content of this page