मंत्री दीपक केसरकारांकडून स्वागत: गावच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे दिले आश्वासन…
⚡सावंतवाडी ता.२५-: ओवळीये ग्रामपंचायत सरपंच तारामती नाईक यांनी शिंदे सेनेमध्ये प्रवेश केला ग्रामविकास आघाडीतून त्या निवडून आल्या होत्या त्यांच्या समवेत या ग्रामपंचायतीचे सदस्य ही शिंदे मध्ये दाखल झाले त्यांना नंतर दीपक केसरकर यांनी पक्षात प्रवेश दिला.
यावेळी सदस्य उमेश नाईक अनिल सावंत चंद्रकांत सावंत बाबुराव सावंत उत्कर्ष नाईक योगेश धुरी यांनी प्रवेश केला. यावेळी यामध्ये मोलाचा वाटा विनायक उर्फ अब्ज सावंत यांचा असल्याचे नामदार केसरकर यांनी सांगितले. यावेळी गावच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे मंत्री केसरकर यांनी दिले आश्वासन
