सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचा राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मान…

महा आवास अभियान २०२१-२२ मध्ये राज्यात सर्वोत्कृष्ट केले काम..

ओरोस ता २३
महा आवास अभियान २०२१-२२ मध्ये राज्य पुरस्कृत आवास मध्ये सर्वोत्कृष्ट काम केल्याने राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा पुरस्कार देवून आज सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचा सन्मान करण्यात आला. मुंबई नरिमन पॉइंट येथील राज्यशासनाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे तत्कालीन प्रकल्प संचालक राजेंद्र पराडकर यांनी हा सन्मान स्वीकारला.

राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रधान सचिव श्री डवरी, कोकण आयुक्त महेंद्र कल्याणकर, नागपूर आयुक्त श्रीमती बिदरी आदींच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

You cannot copy content of this page