⚡कणकवली ता.२३-: कोकण रेल्वे आपल्या मार्गावर धावणाऱ्या गाड्यांमधील तिकीट तपासणी पुढील तीन महिन्यासाठी अधिक तीव्र करणार आहे.अभिमानाने प्रवास करा,सन्मानाने प्रवास करा,तिकीट खरेदी करा आणि अभिमानाने प्रवास करा असा आवाहन कोकण रेल्वे ने केले आहे.
कोकण रेल्वे च्या मार्गावर धावणाऱ्या सर्व ट्रेन्समध्ये सातत्याने तिकीट तपासणी करून विना तिकीट प्रवास करणाऱ्या अनधिकृत प्रवाशांवर कारवाई केली जात असते.ऑगस्ट ते ऑक्टोबर या गेल्या तीन महिन्यात करण्यात आलेल्या तिकीट तपासणीत14,150 विनातिकीट प्रवासी आढळून आले.त्यांच्या कडून 86 लाख 67हजार 820 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.ऑगस्ट 2023 मध्ये 4484 विनातिकीट प्रवाशांकडून 26 लाख 67 हजार 555 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. सप्टेंबर 2023 मध्ये 4888 विनातिकीट प्रवाशांकडून 27 लाख 09 हजार700 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.तर ऑक्टोबर 2023मध्ये 4778 विनातिकीट प्रवाशांकडून32लाख60हजार565रुपयांचादंड वसूल करण्यात आला.
यापुढे ही तिकीट तपासणी ची मोहीम कोकण रेल्वेच्या संपूर्ण मार्गावर सुरू रहाणार आहे. प्रवाश्यानी योग्य व वैध तिकीटासह प्रवास करावा असे आवाहन कोकण रेल्वे ने केले आहे.
