छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या पारगडावर माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर सहीत माजी नगरसेवक उपस्थित..
⚡सावंतवाडी ता.२३-: महाराष्ट्राची कुलस्वामिनी भवानी मातेला आज छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या पारगडावर जात मराठा समाजाचे सावंतवाडी तालुका अध्यक्ष सीताराम गावडे यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या उपस्थितीत मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न सूटून आरक्षण मिळु दे असे साकडे घातले.
माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर,माजी नगरसेवक विलास जाधव, उमेश कोरगांवकर,विलास जाधव, उमाकांत वारंग, यांनी जरांगे पाटील यांच्या लढ्याला यश मिळण्यासाठी महाराष्ट्राची कुलस्वामिनी भवानी मातेला साकडे घालूया अशी इच्छा व्यक्त केली व महारांनी उभारलेल्या चंदगड तालुक्यातील,इसापूर जवळील छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधलेल्या पारगडावर जाऊन, महाराष्ट्राची कुलस्वामिनी भवानी मातेला मराठा समाजाचे सावंतवाडी तालुका अध्यक्ष सीताराम गावडे यांनी गाराने घातले.
महाराष्ट्राची कुलस्वामिनी भवानी मातेला मराठा आरक्षणासाठी साकडे घालूया असे ठरविल्यावर माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर व सर्व सहकाऱ्यांनी पारगडला जात थेट महाराष्ट्राची कुलस्वामिनी भवानी मातेला तीची खणा नारळाने ओटी भरत मराठ्यांना आरक्षण मिळू दे,यासाठी शासनातील मंत्री, मुख्यमंत्री, पंतप्रधान यांना सूबुध्दी दे व मराठ्यांना आरक्षण मिळवून दे त्याच बरोबर सहकारी मंडळीला प्रत्येक क्षेत्रात यश मिळवून दे असे गाराने मराठा समाजाचे तालुका अध्यक्ष सीताराम गावडे यांनी घातले.. तत्पूर्वी सावंतवाडीतून निघताना रयत पिलगीचा रक्षण कर्ता ३६५ खेड्यांचा चाळा श्री देव उपरलकर याला मानकरी उमाकांत वारंग यांनी मराठ्यांना आरक्षण मिळवून दे असे उपरलकर देवाला साकडे घातले.
यावेळी माजी नगरसेवक विलास जाधव, सुरेश भोगटे, उमाकांत वारंग,उमेश कोरगांवकर,सुंदर गावडे,बावतीस फर्नांडिस, इफ्तिकार राजगुरू,साईश गावडे,राजू पडते, निनाद शिरसाट, अशोक पेडणेकर,आदि उपस्थित होते.
