आमदार वैभव नाईक यांना धक्का: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश..
⚡कुडाळ ता.२२-: ठाकरे सेनेचे ओबीसी सेलचे जिल्हाप्रमुख रुपेश पावसकर यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
दरम्यान यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे देखील उपस्थित होते.यावेळी कुडाळ उपतालुकाप्रमुख अरविंद करलकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रवेश करण्यात आला. त्यांच्या या प्रवेशामुळे कुडाळ मध्ये आमदार वैभव नाईक यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.
