दोडामार्ग :- साटेली – भेडशीत श्री गणराज आदर्श सांस्कृतिक कला क्रीडा मंडळाच्या वतीने दीपावली शो टाईम निमित्त शनिवार दि-२५ नोव्हेंबर २०२३ रोजी सायंकाळी ०७:३० वाजता आमने-सामने २०×२० डबलबारी भजनचा जंगी सामना आयोजित करण्यात आला आहे.
हा सामना श्री वडची देवी प्रा.भजन मंडळ लिंगडाळ, देवगड, बुवा संदिप लोके, गुरुवर्य विजय परब, पखवाज योगेश सामंत,तबला संदेश सुतार विरुद्ध श्री हनुमान प्रा. भजन मंडळ वर्दे कुडाळचे बुवा विजय उर्फ गुंडू सावंत गुरुवर्य अशोक सावंत, पखवाज विराज बांवकर,तबला प्रदिप वाळके यांच्यात रंगणार आहे.
तरी सर्व भजन प्रेमींनी या आमने-सामने २०×२० डबलबारी भजनाच्या जंगी सामन्याला उपस्थित रहावे असे आवाहन श्री गणराज आदर्श सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ साटेली यांच्या कडून करण्यात आले आहे.
