⚡मालवण ता.२०-: मालवण शिवसेना ठाकरे गटातर्फे विभागनिहाय बैठका घेण्यात येत आहेत. याअंतर्गत शिवसेना नेते तथा खासदार विनायक राऊत, उपनेते तथा जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दूधवडकर, आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पोईप विभागाची बैठक दि. २१ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता पोईप येथील बाबली पालव यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीला शिवसेना, युवासेना, महिला पदाधिकारी, सर्व विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, विभाग समन्वयक, सर्व शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, बूथप्रमुख, निमंत्रित सदस्य, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व शिवसैनिक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहवे, असे आवाहन तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी केले आहे.
