⚡मालवण ता.२०-: केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांनुसार विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम २०२४ घोषित केला आहे. या कार्यक्रमांतर्गत मतदार नाव नोंदणी करण्यात येते. त्यानुसार भटक्या व विमुक्त ” जमातीतील व्यक्तींसाठी मतदार नावनोंदणी करण्याकरिता २ व ३ डिसेंबर रोजी मालवण येथील तहसील कार्यालय येथे सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत विशेष शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
या शिबिरात नवीन मतदार नोंदणी (नमुना-६) साठी पासपोर्ट आकाराचा पांढरी पार्श्वभूमी असलेला एक फोटो, आधारकार्ड (अनिवार्य), आधारकार्डवरील जन्मनोंद/पत्ता चुकीचा असल्यास शाळा सोडल्याचा दाखला किंवा दहावी, बारावीचे प्रमाणपत्र, निवासाचा कोणताही एक पुरावा, दिव्यांगांकरिता ४० टक्केच्यावर दिव्यांग असलेले सक्षम अधिकारी यांचे प्रमाणपत्र (वरील सर्व कागदपत्रांच्या स्वसाक्षांकित केलेल्या झेरॉक्स प्रती), तर मतदार यादीतील मृत मतदार वगळणे (नमुना- ७) यासाठी मृत्यू प्रमाणपत्राची झेरॉक्स आणणे आवश्यक आहे. या नोंदणी शिबिराचा जास्तीत जास्त ग्रामस्थांनी लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार वर्षा झालटे यांनी केले आहे
