मळगाव येथील अपघातात जखमी चिमुकल्याचा उपचारादरम्यान मृत्यू…

⚡सावंतवाडी ता.१७-: मळगाव पेट्रोल पंपानजीक कारने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या ध्रुव गौरव पावसकर या पाच वर्षीय चिमुकल्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

हा अपघात काल सायंकाळी 7.30 च्या सुमारास घडला होता. यात ध्रुव हा गाडीवरून पडल्याने त्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याच्यावर गोवा बांबूळी येथे उपचार सुरू होते. मात्र उपचार सुरू असताना त्याची प्राणज्योत मालवली.

You cannot copy content of this page