⚡सावंतवाडी ता.०५-: क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व क्रीडा परिषद सिंधुदुर्गद्वारा शनिवार दि. ०२-०९- २०२३ रोजी खेमराज विद्यालय , बांदा येथे संपन्न झालेल्या तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत सेंट्रल इंग्लिश स्कूलच्या १४ वर्षाखालील विद्यार्थ्यांच्या व्हॉलीबॉल संघाने विजेतेपद पटकावून जिल्हास्तरावर धडक मारली. तसेच सोमवार दि . ०४-०९ – २०२३ पाट हायस्कूल , कुडाळ
येथे झालेल्या जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेतही उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत उपविजेतेपद मिळवले.
प्रशालेचे विद्यार्थी कु. अलियान ( संघ कर्णधार ) कु. उमेशकुमार मोतीलाल, कु . राहीश खान, कु. सफवान बांगी , कु . मोहम्मद फैज शेख, कु. अब्दुलसामी पटेल, कु. मुस्तकीम सय्यद , कु . मोहम्मद ऊबैद शेख , कु. सौद बेग या सर्वांनी व्हॉलीबॉल खेळात उत्कृष्ट क्रीडा कौशल्य वापरून जिल्हास्तरीय स्पर्धेत उपविजेतेपद पटकावले . संघातील कु. अलियान व कु. अब्दुलसामी पटेल या विद्यार्थ्यांची पुढील विभागस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी वैयक्तिक निवड करण्यात आली . संघांला प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीम . निर्मला हेशागोळ आणि क्रीडा शिक्षिका श्रीम. मारिया आल्मेडा यांनी मार्गदर्शन केले .
सावंतवाडी मर्कझी जमात , बॉम्बे संस्थेचे पदाधिकारी , प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीम. निर्मला हेशागोळ
सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी , पालक – शिक्षक कार्यकारिणी समिती पदाधिकारी यांनी विजेत्या संघाचे अभिनंदन केले व निवड झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील विभागीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या .
तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत सेंट्रल इंग्लिश स्कूलच्या संघाला विजेतेपद…
