मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी ठाकरे युवा सेनेच्या 18 जणांवर गुन्हा दाखल…

⚡सावंतवाडी ता.०५-: जमावबंदी मनाई आदेश असताना त्याचे उल्लंघन करत येथील शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करण्याचा प्रयत्न करून मनाई आदेशाचे उल्लंघन व अवमान केल्याप्रकरणी सावंतवाडी पोलिस ठाण्यात ठाकरे युवा सेनेच्या 18 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत त्यांना नोटीस देऊन सोडण्यात आले आहे.


येथील केसरकर यांच्या निवासस्थानासमोर आज करे युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बोंबाबोंब आंदोलन आयोजित केले होते मात्र जिल्हाधिकाऱ्यांकडून याची दखल घेत मनाई आदेश जारी केला होता मात्र असे असतानाही या आदेशाचे उल्लंघन करत आंदोलन करण्याचा प्रयत्न युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला त्यांना बस स्थानका समोरच सावंतवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले या प्रकरणी त्यांच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे यामध्ये मंदार शिरसाट कुडाळ, योगेश धुरी माणगाव, अमित राणे कुडाळ,संदीप म्हाडेश्वर कुडाळ, वीरेंद्र चव्हाण आंबडपाल, अमित मांगले ओरस,सागर नाणोसकर नाणोस, राजेश शेटकर पाडलोस, गुणाजी गावडे वेत्ये, आबा सावंत माजगाव, योगेश नाईक दांडेली,रुची राऊत तळगाव, काजल सावंत वर्दे, मीनाक्षी मेथर मालवण,तेजस्वी परब कुडाळ, सोनाली सावंत भडगाव, पायल आढाव मालवण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सर्वांना नोटीस बजावण्यात आल्या असून त्यांना सोडण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी सांगितले.

You cannot copy content of this page