मुळस येथे गुलमोहर कोसळल्याने
बांदा कोल्हापूर मार्गावरील वाहतूक ठप्प

दोडामार्ग,ता.२३-: दोडामार्ग कोल्हापूर मार्गावर मुळस येथे शनिवारी सायंकाळी पाचच्या दरम्यान गुलमोहरचे झाड कोसळल्याने त्या मार्गावरील वाहतूक पाऊण तास ठप्प झाली होती.एसटी व अन्य वाहनातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्याचा फटका बसला. सामाजिक कार्यकर्ते मायकल लोबो,बसत्याव परेरा,एकनाथ शेटकर,हेवाळेचे माजी सरपंच राजाराम देसाई यांनी कटरने झाड कापून रस्ता मोकळा केला.

You cannot copy content of this page