साद फाऊंडेशन विद्यार्थ्यांच्या सदैव पाठिशी

गितांजली नाईक ः पाडलोसमधील मुलांना केले शिक्षणिक साहित्य वाटप

⚡बांदा ता.२२-: साद फाऊंडेशन सिंधुदुर्ग मार्फत जिल्ह्यात आवश्यक ठिकाणी गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप सुरू आहे. तसेच सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्य क्षेत्रातही मोठे योगदान आहे. आपल्या गावातील विद्यार्थी एक अधिकारी बनवा यासाठी आपली सदैव धडपड सुरू असते. मुलांना शैक्षणिकबाबती कोणतीही आर्थिक समस्या निर्माण होऊ नये म्हणून साद फाऊंडेशन सदैव त्यांच्या पाठीशी उभे राहिल, असे प्रतिपादन फाऊंडेशनच्या अध्यक्षा तथा कुडाळ नगरपंचायत प्रशासकिय अधिकारी गितांजली नाईक यांनी केले.

साद फाऊंडेशन सिंधुदुर्गच्यावतीने जिल्हा परिषद शाळा नं.2 पाडलोस मधील विद्यार्थ्यांना वह्या, रंगपेन, चित्रकला वही वाटप करण्यात आले. यावेळी शालेय समिती अध्यक्ष हर्षद परब, सामाजिक कार्यकर्ते अमोल नाईक, रुक्मिणी नाईक, मुख्याध्यापक अस्मिता आरोसकर, अंगणवाडी सेविका अश्विनी साळगावकर, ग्रामस्थ राजन पटेकर, पपू कुबल, विलासिनी नाईक आदी उपस्थित होते.

मुख्याध्यापक अस्मिता आरोसकर यांनी सूत्रसंचालन करताना प्रशासकिय अधिकारी गितांजली नाईक यांना गावातील ग्रामिण भागात असलेल्या शाळांप्रती असलेली ओढ नक्कीच विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे. गावातील मुलगी आज एक कुशल प्रशासक बनली असून याचा आदर्श सर्वांनी घ्यावा, असे सांगत उपस्थित सर्वांचे सौ.आरोसकर यांनी आभार मानले.

You cannot copy content of this page