दारूच्या नशेत गुजरात येथील तरुणाने तिघांना ठोकरले

रेंजरोव्हर आलिशान गाडीने काढला होता पळ:आंबोली पोलिसांनी घेतले ताब्यात

आंबोली ता.२२-:दारूच्या नशेत तब्बल तिघांना उडवून देणाऱ्या नशेखोर युवकाला आंबोली पोलिसांनी ताब्यात घेतले. हा थरारक प्रसंग सावंतवाडी राजवाडा हाॅस्पिटल गवळीतिठा परिसरात घडला. अनेकांनी त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केल्यानंतर रेंजरोव्हर ही आलिशान गाडी घेऊन त्याने आंबोलीच्या दिशेने पळ काढला. करणसिंग विमलसिंग आहेर (रा. गुजरात, वय २६ ) असे त्या चालकाचे नाव आहे. त्याला आंबोली पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पुढील कारवाई त्याच्यावर करण्यात येणार आहे

You cannot copy content of this page