सलग दुसऱ्या दिवशी शाळांना सुट्टी…

पावसाचा कहर सुरू असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश

ओरोस ता.२०-:

जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी यांनी सलग दुसऱ्या दिवशी २१ जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना एक दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीत अतिवृष्टी होत असून 20 जुलै ते 23 जुलै या कालावधीत जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे. जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत देखील वेगाने वाढ होत आहे. तसेच कोकण विभागातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांना सुट्टी जाहीर करणे बाबतच्या सूचना प्राप्त झालेल्या आहेत. त्यानुसार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष या नात्याने प्राप्त अधिकारानुसार, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 नुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, सर्व सरकारी व खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका शाळा, अनुदानित व विनाअनुदानित शाळा, सर्व आश्रम शाळा, सर्व महाविद्यालये व आयुक्त व्यवसाय व प्रशिक्षण केंद्र यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्था यांना २१ जुलै रोजी सुट्टी जाहीर केली आहे. दरम्यान, २० रोजी सुद्धा अशा प्रकारची सुट्टी जिल्हाधिकारी यांनी शाळा, कॉलेज यांना जाहीर केली होती.

You cannot copy content of this page