शंकर सावंत यांनी खेमराज प्रशालेला केली दहा हजारांची मदत

बांदा/प्रतिनिधी
अमेरिकेचे उद्योजक व मुळ बांदा-गडगेवाडी येथील खेमराज मेमोरिअल इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेजचे माजी विद्यार्थी शंकर सावंत यांनी खेमराज प्रशालेला दहा हजार रुपयांची देणगी दिली.


सावंत हे १९९३ सालच्या सायन्सच्या बॅचचे विद्यार्थी होते. ते सॉफ्टवेअर डेव्हलपर असून अमेरीकेत त्यांची स्वतःची कंपनी आहे. काही दिवसांसाठी देशात आलेल्या सावंत यांनी आपल्या शाळेला भेट देऊन शिक्षक व सायन्सच्या विद्यार्थ्यांशी हितगुज साधले. परदेशातील नोकरीच्या संधी या बाबत मार्गदर्शन करत मनापासून प्रयत्न केलात तर प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा उत्तम यश मिळवाल हा संदेश त्यांनी मुलांना दिला.
यावेळी सामजिक बांधिलकी जोपासत शाळेला मदत म्हणुन दहा हजार रुपयांचा धनादेश मुख्याध्यापिका सौ. माधवी सावंत यांच्याकडे सुपूर्द केला. भारतीय संस्कृती हिच सर्वात श्रेष्ठ आहे आणि तिची ओळख मुद्दाम मी माझ्या मुलांना करून देतो असे मित्रमंडळा बरोबर सामाजिक कार्यात सक्रीय सहभागी असणारे सावंत यावेळी म्हणाले.
फोटो :-
बांदा खेमराज प्रशाळेच्या मुख्याध्यापिका माधवी सावंत यांच्याकडे देणगी सुपूर्द करताना उद्योजक शंकर सावंत.

You cannot copy content of this page