Headlines

आरोस विद्या विकास हायस्कूल मधील मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

बांदा/प्रतिनिधी
आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूल मधील विद्यार्थांना विजय सोनावळे मित्र मंडळ व निलेश परब मित्र मंडळाने सामाजिक भावनेतून शैक्षणिक साहित्याचे वाटप केले.


यावेळी शाळेचे मुख्याध्यापक विद्याधर देसाई यांनी सांगितले की, या मंडळाने दरवर्षी प्रमाणे ह्या ही वर्षी या हायस्कूल मधील सर्व विद्यार्थांना वह्यांचे वाटप केले खरोखरच या मंडळाला धन्यवाद देतो. कारण आता दिवसेंदिवस शैक्षणिक साहित्यांचे दर वाढत आहेत. त्यामुळे पालकांना आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागते. त्यामुळे काही प्रमाणात या मंडळाने हातभार लावला ही कौतुकाची गोष्ट आहे. विद्यार्थांना शैक्षणिक मदत व्हावी म्हणून विजय सोनावळे, निलेश परब मित्र मंडळ सामजिक बांधिलकीतून विद्यार्थ्याना मदत करत असतात. त्यांचे कार्य खरोखरच प्रेरणा देणारे असेच आहे. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त करून मंडळाला धन्यवाद दिले.
कार्यक्रमाची सुरुवात प्रशालेतील विद्यार्थ्यांच्या स्वागत गीताने करण्यात आली. यानंतर मान्यवरांचे स्वागत करून वह्यांचे वाटप करण्यात आले.
यावेळी संस्था अध्यक्ष रोहिदास सावंत, उपाध्यक्ष निलेश परब, विजय सोनावळे, सचिन राव, सौ. अभिलाषा राव, लक्ष्मी राव, सोपान पवार, महेश परब, संदीप नेमळेकर, अर्जुन मुळीक, मदन मुरकर, उल्हास मुळीक, सौ. मनीषा परब, मुख्याध्यापक विद्याधर देसाई, शिक्षक श्री सावंत, सौ. समिधा मांजरेकर, सौ. देवयानी चव्हाण, सौ. श्रद्धा परब, श्रीमती नाईक, शिक्षकेत्तर कर्मचारी तानाजी खोत, शाळेचे विद्यार्थी, कर्मचारी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तानाजी वरक तर आभार अनिल नाईक यांनी मानले.
फोटो :-
आरोस येथील प्रशालेत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. त्यावेळी उपस्थित असलेले मान्यवर.

You cannot copy content of this page