कुडाळ शहरात खड्डे जैसे थे; नगरपंचायत मात्र सुशेगाद

⚡कुडाळ ता.१८-: कुडाळ शहरांमध्ये खड्ड्यांची स्थिती आणखीनच दयनीय झाली आहे. शहरातील छत्रपती शिवाजी महाराजनगर ते कुडाळ बाजारपेठ या मार्गाची अक्षरशः दुरवस्था झाली असून ‘रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते’ असे म्हणायची सामान्य नागरिकांवर वेळ आली आहे.


याबाबत मात्र, कुडाळ नगरपंचायत प्रशासन मात्र सुशेगाद असल्याचे दिसून येत आहे. तर कुडाळ शहरात प्रवेश करताना असणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यानजीक खड्डे पडले असून हे खड्डे काही दिवसांपूर्वीच चिरे घालून बुजविण्यात आले होते. परंतु, काही दिवसात हे खड्डे पुन्हा जैसे थे स्थितीत आले आहेत. या खड्ड्यातून वाहन चालविताना अपघात घडू शकतात. मात्र, हे खड्डे पावसाळ्यापूर्वी डांबरीकरण करून भरणे आवश्यक होते. पण, याबाबत कुडाळ नगरपंचायत उदासीन असून याचा फटका मात्र नागरिकांना बसत आहे.

शहरात अजूनही पाणी साचण्याचे प्रकार
मुसळधार पाऊस पडल्यानंतर कुडाळ शहरात अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचत असल्याच्या घटना घडल्या आहेत. मुख्य म्हणजे पाणी वाहून जाण्यासाठी त्यातील कचरा साफ करणे महत्वाचे होते. पण नालेसफाई योग्य पद्धतीने न झाल्याने कुडाळ शहरात अनेक ठिकाणी पाणी तुंबण्याच्या घटना घडल्या आहेत.

You cannot copy content of this page