कणकवलीत पुस्तकांचे वाचन करत पी.एन.पणिकरांना केले अभिवादन…

⚡कणकवली ता.१८-: केरळ राज्यातील ग्रंथालय व सारक्षता चळवळीचे जनक पी. एन.पणिकर यांच्या स्मृतिनिमित्त कणकवली नगरवाचनालयात विद्यार्थी व वाचकांनी विविध पुस्तकांचे वाचन करत त्यांना अभिवादन केले.


यावेळी वाचनालयाचे कार्यवाह हनीप पिरखान,सहकार्यवाह डी. पी.तानवडे,सदस्य पी.जे.कांबळे, शिक्षक स्नेहा सावंत ग्रंथालयाचे कर्मचारी उपस्थित होते.
केरळ राज्यातील ग्रंथालय व सारक्षता चळवळीचे जनक पी. एन.पिणकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालय व राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकत्ता यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील सार्वजनिक ग्रंथालयांमध्ये विविध कार्यक्रमांनी वाचन दिवस, वाचन आठवडा, वाचन महिना साजरा केला
जात आहे. कणकवली वाचनालयात वाचन दिन साजरा करण्यात आला. यात कणकवली विद्यामंदिर मधील विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या विषयांवरील विविध पुरस्तकांचे वाचन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी विधी चिंदरकर हिने केले.तर हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी ग्रंथालय कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.

You cannot copy content of this page