शिक्षक नियुक्तीसाठी डी एड बेरोजगार संघटनेचे जिल्हा राजधानीत धरणे आंदोलन सुरू

ओरोस ता.१७-:

शिक्षण भरतीत स्थानिकांना प्राधान्य मिळावे आणि सेवानिवृत्त ऐवजी स्थानिक डीएड बेरोजगारांना संधी द्यावी या मागणीसाठी सिंधुदुर्ग डीएड बेरोजगार संघर्ष समितीच्यावतीने जिल्हा परिषद समोर धरणे आंदोलन छेडण्यात आले.
सिंधुदुर्गात ८०२ उपशिक्षक, ३१६ पदवीधर शिक्षक आहेत व आंतर जिल्हा बदल ४५१ शिक्षकांना कार्यमुक्त केले आहेत व तर ११ शिक्षक जिल्ह्यात आलेले आहेत. एकंदरीत एकूण १९९८ रिक पदे आहेत. त्यामूळे पवित्र पोर्टल नुसार भरती झाली तर आपल्या जिल्ह्यातील १० टक्के पण उमेदवार लागणार नाही ही बाब पाहता पवित्र पोर्टल हे सिंधुदुर्ग डी. एड बेरोजगारांवर अन्यायकारक ठरणार आहे. आयबीपीएसने हल्लीच घेतलेली परीक्षेतील प्रश्न बँकींग क्षेत्राशी निगडित होते हीदेखील परीक्षा संशयाच्या भोवऱ्यात अडकली अस दिसते त्यामुळे या परीक्षेद्वारे शिक्षक पदभरती करू नये. ही परीक्षा रद्द करण्याचा शासन निर्णय निर्गमित व्हावा.
परजिल्ह्यातील उमेदवार तीन वर्ष नोकरीसाठी सिंधुदुर्ग मध्ये येतात आणि परत बदली करून आपल्या जिल्हयात जातात त्यामुळे शाळा पुन्हा शिक्षकाविना रिक्त राहतात. जर तिथे भरती प्रक्रियेतून स्थानिक शिक्षकांना नियुक्त्या मिळाल्या तर वारंवार होणारी आंदोलने आणि स्थानिक भूमिपुत्र यांच्यावर होणारा अन्याय आणि बदली प्रक्रियेचा मोठा प्रश्न मिटून जाईल. महाराष्ट्र राज्यातील शिक्षक भरती होत असताना प्रत्येक जिल्हास्तरावर स्थानिकांना ८० टक्के जागावर प्राधान्य देऊन उरलेल्या २० टक्के जागांवर इतर जिल्ह्यातील उमेदवाराना संधी देऊन डी.एड. पदविका मेरीटवरच सरसकट भरतीचा शासन निर्णय व्हावा.
स्थानिक प्राधान्य देऊन पूर्वी प्रमाणे सेवायोजन कार्यालयामार्फत, जिल्हा निवड समिती मार्फत किवा रद्द झालेले कोकण निवड मंडळ पुन्हा निर्माण करून स्थानिक पातळीवर डी.एड च्या मेरीट प्रमाणे स्थानिकानमधूनच सरसकट शिक्षक भरती करावी या मागणीसाठी आज सिंधुदुर्ग डीएड बेरोजगार संघर्ष समितीच्यावतीने जिल्हा परिषद समोर धरणे आंदोलन छेडण्यात आले.

You cannot copy content of this page