Headlines

आई-वडिलांच्या पुण्याईमुळेच श्री देव वेतोबाची भूमिका साकारण्याचे भाग्य

अभिनेते उमाकांत पाटील यांची माहिती: मालिकेचा पहिला भाग आजपासून होणार प्रदर्शित..

⚡सावंतवाडी ता.१७-: श्री देव वेतोबाची मुख्य भूमिका साकारण्याचे भाग्य मला मिळाले ही मी माझ्या आई-वडिलांची पुण्याई समजतो असे भावोद्गार आजपासून सन मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या वेतोबा मालिकेचे मुख्य अभिनेते उमाकांत पाटील यांनी काढले.

ही मालिका श्री देव वेतोबाच्या आशिर्वादाने नक्कीच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

या मालिकेचा पहिलाच भाग आजपासून प्रदर्शित होत असून त्या पार्श्वभूमीवर सावंतवाडित आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते

You cannot copy content of this page